नंदुरबार - दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये समोर आला आहे. ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नंदुरबारमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून पळवले पैसे, सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद - THEFT
नंदुरबारमधील आझाद लस्सी या दुकानासमोर एक दुचाकी (एम.एच. ३९ डी ८१६०) उभी होती. ही दुचाकी घनश्याम मुडके यांची होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी दीड लाख रुपये ठेवले होते. त्यांच्यावर पाळत ठेवत चोरांनी त्यांच्या पैशांवर हात साफ केला.

दुकानासमोर उभी असलेल्या दुचाकीची डिक्की एकजण उघडून गेला. त्यानंतर दुसऱ्याने येऊन त्यातील पैसे पळवले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पैसे गेल्याचे समजताच घनश्याम मुडके यांनी पोलिसात धाव घेतली. यासंबंधी नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.