नंदुरबार - हिंगणघाट येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलिसांच्या वतीने रोडरोमियोंच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमियो फिरत असतात. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे.
विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांवर रोडरोमियोंवर पोलिसांची करडी नजर - रोडरोमियो कारवाई पोलीस
नंदुरबार शहर परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असल्याने शाळा, महाविद्यालय परिसर आणि बस स्थानक परिसरात रोडरोमियो उभे असतात. त्या विरोधात धडक मोहीम हाती घेऊन पोलीस दलाने जवळपास 25 ते 30 रोडरोमियोंवर कारवाई केली.
नंदुरबार शहर परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असल्याने शाळा, महाविद्यालय परिसर आणि बस स्थानक परिसरात रोडरोमियो उभे असतात. त्या विरोधात धडक मोहीम हाती घेऊन पोलीस दलाने जवळपास 25 ते 30 रोडरोमियोंवर कारवाई केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने रोडरोमियोंच्या विरोधात सुरू केलेली ही धडक मोहीम अशीच कायम सुरू राहावी, अशी मागणी पालक वर्गाने केली आहे. त्यानुसार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी दिली.