नंदुरबार - कोरोना प्रतिबंधासाठी नंदुरबार नगरपालिकेने आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही भाजीपाल्याची दुकाने लावणार्या 10 ते 15 किरकोळ विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या पथकाने पोलीसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाईत विक्रेत्यांकडील साहित्य पथकाने जप्त केले.
भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई; नगरपालिकेने हाती घेतली मोहीम - कोरोना प्रतिबंध
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी नंदुरबार नगरपालिकेने आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही भाजीपाल्याची दुकाने लावणार्या 10 ते 15 किरकोळ विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.
भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदीत सर्वच व्यवहार बंद असून केवळ जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शाळा क्र.1 च्या मागील रस्त्यावर भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही मंगळबाजार आणि सुभाष चौक परिसरात काही विक्रेते दुकान लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या पथकाने त्यांच्या विरोधात मोहीम राबवली.