महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे 'मिटले'; आता भाजपचे 'बिघडले'? - hina gavit

लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बंड शमल्यानंतर आता भाजपमध्ये बंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुहास नटावदकर यांच्या कुटुंबीयांनी तीन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पक्षश्रेष्ठींकडून नटावदकरांना सांगण्यात आले आहे. त्यामुळेच हे उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याची चर्चा नंदुरबारमध्ये रंगली आहे.

समिधा नटावदकर, हिना गावित

By

Published : Apr 2, 2019, 7:15 PM IST

नंदुरबार- लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बंड शमल्यानंतर आता भाजपमध्ये बंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुहास नटावदकर यांच्या कुटुंबीयांनी तीन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पक्षश्रेष्ठींकडून नटावदकरांना सांगण्यात आले आहे. त्यामुळेच हे उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याची चर्चा नंदुरबारमध्ये रंगली आहे.

समिधा नटावदकर

डॉक्टर नटावदकर यांचे कुटुंबीय हे जनसंघापासून भाजपशी जोडलेल आहे. नटावदकर कुटुंबाची तिसरी पिढी आता भाजपसोबत कार्यरत आहे. अशा निष्ठावंत परिवारातून उमेदवारी अर्ज दाखल केला गेला तर याचा फटका निश्चितच पक्षाच्या उमेदवार असलेल्या डॉक्टर हिना गावित यांना बसणार आहे.

सुहास नटावदकर यांच्या कुटुंबातून त्यांच्या कन्या डॉक्टर समिधा नटावदकर या उमेदवारी करणार आहेत. डॉक्टर नटावदकर हे कोल्हापूरला चंद्रकांत पाटील यांची भेट घ्यायला गेले आहेत. एकंदरीतच भाजपमध्ये हे बंड जाणीवपूर्वक केल गेल आहे? की उमेदवार बदलला जाणार? याची चर्चा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details