नंदुरबार - नंदुरबार येथील भाजपा पदाधिकारी रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असून एका हॉटेलमध्ये रेमडेसिवीरचा साठा असल्याचा आरोप काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. यावर बोलताना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले, की रेमडेसिवीरचा कोणताही काळाबाजार केला नाही किंवा साठाही केलेला नाही. शासनाच्या अटीशर्ती पूर्ण करून आपण लोकांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले आहे. शासनाने परवानगी दिली तर आपण काही तासात एक लाख रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचा दावा केला त्यांनी केला आहे. दरम्यान, लोकांचा जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न जर गुन्हा ठरत असेल तर मी गुन्हा केला आहे आणि असा गुन्हा मी पुन्हा करणार, असेही यावेळी शिरीष चौधरी यांनी सांगितले.
..तर काही तासात एक लाख इंजेक्शन उपलब्ध करणार - शिरीष चौधरी - एक लाख इंजेक्शन उपलब्ध करणार
दररोज लोक मृत्यूमुखी पडत असून मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. अशा परिस्थिीत श्रेय घेण्याच्या किंवा राजकारण करण्याच्या हेतूने नव्हे तर रूग्णसेवा हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वत: रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी मी केलेला प्रयत्न जर गुन्हा ठरत असेल तर होय मी गुन्हा केला आहे आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी असा गुन्हा मी पुन्हा करणार असेही चौधरी यांनी सांगितले आहे.
'रेमडेसिवीरचा कोणताही साठा नाही'
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी हिरा उद्योग समूहातंर्गत रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे. यात कोणताही काळाबाजार करण्यात आलेला नाही. शासनाच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करून रेमडेसिवीर उपलब्ध केले आहे. माझ्याकडे निर्यातीचा परवाना आहे. इंजेक्शन खरेदी केल्याचे सर्व बिल आहेत. नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज लोक मृत्यूमुखी पडत असून मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. अशा परिस्थितीत श्रेय घेण्याच्या किंवा राजकारण करण्याच्या हेतूने नव्हे तर रूग्णसेवा हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वत: रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी मी केलेला प्रयत्न जर गुन्हा ठरत असेल तर होय मी गुन्हा केला आहे आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी असा गुन्हा मी पुन्हा करणार असेही चौधरी यांनी सांगितले आहे.
'मलिकांनी मृत्यूचे तांडव पहावे'
नवाब मलिक यांनी कार्यालयात बसून आरोप करण्यापेक्षा नंदुरबारला येवून मृत्यूचे तांडव पहावे. स्मशानात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.अशा परिस्थितीत रूग्णांसाठी प्रामाणिक सेवा केली तर काय गुन्हा केला, असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला आहे. रेमडेसिविरवरून राजकारण करण्यापेक्षा रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही शिरीष चौधरी दिला आहे.
हेही वाचा -भाजपाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला - नवाब मलिक