नंदुरबार- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकार्यांकडे जाहीर निषेध व्यक्त करत निवेदन दिले.
पाकिस्तानचा ध्वज जाळत पुलवामा हल्ल्याचा नंदुरबारमध्ये तीव्र निषेध
पाकिस्तानचा ध्वज जाळत नंदुरबारमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
निषेध
ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पाठीवर वार केला आहे. त्यांना सरकारने तसेच उत्तर देऊन देशातील जनतेचा व सैनिकांचे मनोधैर्य उंचावले पाहिजे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील अंधारे चौकात या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. सुभाष चौक येथे युवा सैनिकांद्वारे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध नोंदवला.