नंदुरबार - जिल्ह्यातील प्रकाश आणि सारंखेडा येथील तापी नदीवरील बॅरेजवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने या ठिकाणची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सुमारे दीड वर्षापासून या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. पावसाळ्यात बॅरेजच्या ठिकाणी वायरमन आणि हेल्पर असणे आवश्यक असते. मात्र, या दोन्ही बॅरेजच्या सुरक्षिततेकडे तापी खोरे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
तापी नदीवरील सारंखेडासह प्रकाश येथील बॅरेजच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Barrej
या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
तापी नदीवरील सारंखेडासह प्रकाश येथील बॅरेजच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नंदुरबार येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.