नंदूरबार- नवापूर तालुक्यातील कोटखांब गावामध्ये अवैद्यरित्या साग लाकडाची तस्करी करणाऱ्या गाडीचा वनकर्माचाऱ्यांने पाठलाग करत तब्बल ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नवापूर तालुक्यातील कामोद, कोटखांब गावातून लाकडाची तस्कर होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. तेव्हा वनविभागाने ही कारवाई केली.
सागवान तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने पाठलाग करुन केली कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - smuggling
नवापूर तालुक्यातील कामोद, कोटखांब गावातून लाकडाची तस्कर होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. तेव्हा वनविभागाने ही कारवाई केली.
नवापूर तालुक्यातील कोटखांब गावांमधून अवैद्यरित्या साग लाकडांची तस्करी होणार असल्याची बातमी मिळाली होती. यावरुन वनविभागाने, आरोपींच्या गाडीचा पाठलाग केला. तेव्हा वनविभाग पाठलाग करत असल्याचे पाहून आरोपींनी डोकारे गावाजवळ गाडी सोडून पळ काढला. वनविभागाने लाकडासह गाडी ताब्यात घेतली आहे. आरोपींना पळ काढण्यात स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे समजते.
वनविभागाने सागवाणी लाकडे ज्याची किंमत बाजार भावप्रमाणे ३० हजार व गाडीची किमत ३ लाख ७० हजार असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेली गाडी व मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लाकूड तस्करामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.