नंदुरबार- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मदत म्हणून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत दिली आहे. तसेच आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनीही आपल्या एका महिन्याचे वेतन 1 लाख रुपये कोरोनाच्या उपाययोजनांसाठी दिले आहे.
खासदार डॉ. हिना गावितांची पीएम केअर फंडला 1 कोटींची मदत - नंदुरबार कोरोना
डॉ. हिना गावित व नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन एक लाख रुपये कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मदत म्हणून दिले आहे.
देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणुला रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. अनेक दानशूर व्यक्तींकडून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मदत देण्यात येत आहे. हिना गावित यांनीही आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून 1 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देऊन कोविड-19 ला रोखण्यासाठी मदतीचा हातभार लावला आहे. तसेच डॉ. हिना गावित व नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन एक लाख रुपये कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मदत म्हणून दिले आहे. या मदतनिधी संदर्भातील पत्र डॉ. हिना गावित व डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सुपूर्द केले आहे.