नंदुरबार -गेल्या साडेचार वर्षातील योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला आहे. गेल्या ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मी साडेचार वर्षात करून दाखवले असल्याचे वक्तव्य नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केले आहे.
काँग्रेसला ७० वर्षांत जमले नाही ते मी केले - हिना गावित - हिना गावित
नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचा अद्यापही कुठलीही मोठी प्रचार सभा झालेली नाही. याऊलट गावित यांनी मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात सभांचा सपाटा लावला आहे.
हिना गावित काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत रंगणार आहे. मात्र, नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचा अद्यापही कुठलीही मोठी प्रचार सभा झालेली नाही. याऊलट गावित यांनी मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यामधून त्या भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा गड होता. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून हिना गावित यांनी बाजी मारली होती. यावेळेस मात्र काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये 'काँटे की टक्कर' होण्याचे संकेत दिसत आहे.