महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणिकराव गावितांची तलवार म्यान, नंदुरबारमध्ये काँग्रेसलाच पाठिंबा - loksabha

माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले, की काँग्रेस पक्षाने जो आदेश दिला आहे, त्याचे आम्ही पालन करू. काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. सी. पाडवी यांना आमचा पाठिंबा राहिल. त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही नवापूर तालुक्यात पूर्ण प्रयत्न करू.

भरत माणिकराव गावित

By

Published : Apr 3, 2019, 11:22 AM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते व त्यांच्यात नाराजी होती. त्यामुळे माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित हे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत होते. पण, आता गावित काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. नावापुर तालुक्यातील मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गावित काँग्रेसला पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले आहे

माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले, की काँग्रेस पक्षाने जो आदेश दिला आहे, त्याचे आम्ही पालन करू. काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. सी. पाडवी यांना आमचा पाठिंबा राहिल. त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही नवापूर तालुक्यात पूर्ण प्रयत्न करू.

माणिकराव गावित यांनी नऊ वेळा खासदार पद भूषवले आहे. पक्षाने आम्हाला भरभरून दिले आहे. यावेळी उमेदवारी नाकारली तरी हरकत नाही. भविष्यात आम्हाला काँग्रेस पक्ष अजून वाढवेल हा आम्हाला विश्वास आहे, असे भरत गावित यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details