नंदूरबार - दत्त जयंतीपासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत २ हजार ५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत २५० घोड्यांची विक्री झाली आहे. यावर्षी घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत आहे. यावेळच्या चेतक महोत्सवामध्ये आत्तापर्यंत १ कोटीची उलाढाल झाली आहे. यावेळी उलाढालीचा नवा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चेतक महोत्सवामध्ये १ कोटींची उलाढाल, यंदा नवा विक्रम यंदा होण्याची शक्यता - चेतक फेस्टिवलमध्ये १ कोटींची उलाढाल
दत्त जयंतीपासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत २ हजार ५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत २५० घोड्यांची विक्री झाली आहे. यावर्षी घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत आहे. यावेळच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये आत्तापर्यंत १ कोटीची उलाढाल झाली आहे. यावेळी उलाढालीचा नवा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षीच्या घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत असून, घोडे बाजार उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघतील असा अंदाज आहे. अवघ्या ३ दिवसात घोडे बाजाराने 1 कोटीचा टप्पा पार केला आहे. जातीवंत आणि उमद्या घोड्यासाठी सारंगखेडा येथील घोडेबाजाराची ओळख आहे. या अश्व पंढरीत देशभरातून अश्व शौकिन अश्व खरेदीसाठी येत असतात. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारात मंदी राहील असा अंदाज होता. मात्र, घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे.
तीन दिवसात 250 घोड्यांची विक्री झाली आहे. त्यातुन 1 कोटीची उलाढाल झाली आहे. त्यामुळे या वर्षी घोडे बाजार उलाढाली चे सर्व विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज आहे. सरकारने आणि पर्यटन विभागाने मदत नाकारली असताना चेतक फेस्टिवलचे लोकसहभागातून उत्तम नियोजन केले आहे.