महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधून गुजरातला जाणारी दारू जप्त - अवैधरीत्या दारू

महाराष्ट्रातून गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सुबीर येथे अवैधरीत्या विक्रीसाठी नेली जाणारी दारू जप्त करण्यात आली.

जप्त केलेली दारू

By

Published : Nov 18, 2019, 11:05 AM IST

नंदुरबार- महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात दारू तस्करीला उत आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रातून गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सुबीर येथे अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येणारी दारू पकडण्यात आली. यावेळी ८० हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवापूर तालुक्यातील नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर दारूने भरलेली कार व चालकाला नवापूर पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये 80 हजार रुपयांचा मुद्देमाल नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी जप्त केला आहे. दारू तस्करी संदर्भात नवापूर पोलीसांना कारवाई करण्यास यश मिळत आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दारू प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र विभाग असताना एवढा हलगर्जीपणा का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

गुजरात राज्यात दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान नवापूर ते पिंपळनेर रोड दरम्यान वावडी फाटा येथे संशयित वाहनाला थांबवून कारची तपासणी केली. यावेळी 50 हजार 184 रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या एकूण 288 बाटल्या व ३० हजार रुपयांची चारचाकी (जी जे 19 ए 2161) असा एकूण 80 हजार 184 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी मनश्या बैजु म्हात्रे (वय 36, रा. दहेल, ता. सुबीर, जि. डांग, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नवापूर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अवैध दारू वाहतूक, तस्करी, विक्री करणाऱ्या दारू माफियावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात दारू बंदी असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात असलेल्या नवापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. याकडे वरिष्ठांना लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रमुख महामार्गांची दुरवस्था; नागरिकांच्या जिवाशी खेळ

ABOUT THE AUTHOR

...view details