नंदुरबार - शहर आणि जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी आहे. या ठिकाणी नागरिकांकडून सुरक्षित अंतरही ठेवले जात नव्हते. आज पेन्शन घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बँकांच्या बाहेर गर्दी केली होती. अखेर बँक प्रशासनाने गर्दी हटविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. कोरोनासंदर्भात लोक कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जिल्ह्यातील बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी; कोरोनाबाबत सुरक्षा नाही - नंदुरबार कोरोना
आज पेन्शन घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बँकांच्या बाहेर गर्दी केली होती. अखेर बँक प्रशासनाने गर्दी हटविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. कोरोनासंदर्भात लोक कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जिल्ह्यातील बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार यांनी राज्यातील नागरिकांच्या जनधन खात्यात मदतनिधी टाकल्यामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात तो निधी मिळविण्यासाठी बँकांच्या बाहेर गर्दी झाली. बँक ग्राहक सेवा केंद्र, एटीएम अशा पैसे उपलब्ध होणाऱ्या ठिकाणांवर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे शहर प्रशासनावर ताण आला. नागरिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसून आले.