नंदुरबार - प्रशासनाकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील कापसाचे पंचनामे करण्यात आले आहेत. तरीही कापूस खरेदी होत नसल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दररोज 20 शेतकऱ्यांचा कापसाची मोजणी केली जात असून यामध्ये वाढ करुन 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहे.
नंदुरबारमधील कापूस खरेदीचे प्रमाण वाढवा; शेतकऱ्यांची मागणी - नंदुरबार कापूस
लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा घरात कापूस घरात पडून आहे. अशातच, सरकारकडून कापूस खरेदी होत नसल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दररोज 20 शेतकऱ्यांचा कापसाची मोजणी केली जात असून यामध्ये वाढ करुन 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.
उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांच्या या पांढऱ्या सोन्याला कोरोनामुळे उतरती कळा लागली आहे. लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा घरात कापूस घरात पडून आहे. खासगी व्यापारी कापूस खरेदी करत नाही, केला तर कवडी मोल भावाने खरेदी करतात. शासकीय खरेदी कासवाच्या गतीने होत आहे. वातावरणात बदल झाले खरेदी बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. दरम्यान, प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या कापसाचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अजूनही प्रशासनाकडून खरेदी न केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी करण्यात आला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच दररोज 20 शेतकऱ्यांचा कापसाची मोजणी केली जात असून यामध्ये वाढ करुन किमान 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.