नंदुरबार- सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा या तालुक्यांत भीषण पाणीटंचाई होती. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त प्रकाशीत करताच प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या आहेत.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट; भीषण पाणीटंचाईचे वास्तव उघड केल्यानंतर प्रशासनाने केल्या उपाययोजना
अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा या तालुक्यांत भीषण पाणीटंचाई होती. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त प्रकाशीत करताच प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या आहेत.
प्रशासनाने दुर्गम भागांत दोन ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. तर काही ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून 91 ठिकाणी गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ईटीव्ही भारतने पाणीटंचाइचे वास्तव उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जेथे पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली आहे.
दुर्गम भागात तहसीलदारांनी भेटी देऊन नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील चाराटंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी यावेळी सांगितले.