नंदुरबार - शहादा तालुक्यातील जॅकवेल परिसरात अवैधरित्या ताडी निर्मिती करण्याच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी ताडी बनविण्याच्या साहित्यासह एकूण १ लाख १२ हजार ३३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये अवैधरित्या रासायनिक निर्मितीची ताडी जप्त - राज्य उत्पादन शुल्क
शहादा तालुक्यातील जॅकवेल कॉलनी परिसरात अवैधरित्या ताडी निर्मिती करून विक्रीसाठी बाहेर पाठवली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्काला मिळाली. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचून ताडी बनविण्याच्या साहित्यासह एकूण १ लाख १२ हजार ३३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अधिकृतरीत्या ताडी विक्री करण्यास कोणालाही परवानगी नाही. अवैधरित्या ताडी विक्री करणाऱ्यांविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. तसेच रासायनिक पद्धतीने बनविलेल्या ताडीचा सेवन करणे शरीराला हानीकारक असते. त्यामुळे त्याचे सेवन करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.