नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसातील सलग तिसऱया कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त; मोलगी पोलिसांची कारवाई - illegal liquor news from nandurbar
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसातील सलग तिसऱया कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
मोलगी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार हे मोलगी रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी त्यांना धडगावहून मोलगीकडे अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याची गुप्तवार्ता मिळाली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार व अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पगार यांनी फौजदार पी.पी.सोनवणे, पो.कॉ.रवींद्र कुवर व अन्य कर्मचाऱयांसह भगदरी फाट्या जवळ सापळा रचला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास जीप (एमएच 04 एफजे6867) ही चारचाकी अडवली.
संबंधित जीपची तपासणी केल्यानंतर यामध्ये मध्यप्रदेश मधील बनावटीचे मद्य आढळले. यानंतर पोलिसांनी वाहनचालक संजय कागडा पाडवी (रा.कुंडलचा) याला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.पी. सोनवणे करत आहेत.