महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र गुजरात सीमेवर दारु तस्करी, २४ लाखांची दारु घेऊन जाणारा टँकर पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार, गुजरात राज्यात महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याची घटना समोर आली आहे... रासायनिक टँकरमधून होणारी चोवीस लाखांची दारू जप्त...

दारु तस्करी करणारा ट्रक जप्त

By

Published : Jun 26, 2019, 9:51 PM IST


नंदुरबार - गुजरातमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याची घटना समोर आली आहे. दारूचा सुगावा पोलिसांना लागू नये म्हणून टँकरमधून दारू अवैध मार्गाने नेत असताना गुजरात पोलिसांनी एक टँकर पकडला. चालकाला अटक करण्यात आली असून चार संशयित आरोपी फरार आहेत. यात नवापूर नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाचा नगरसेवक विश्वास बडोगे यांच्या समोवश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नवापूर परिसरातून दारूने भरलेला टँकर क्रमांक एम एच ०५ के ८७६७ येत असल्याची गुप्त माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. आनंद जिल्ह्यातील वासदहून डाकोरला जात असताना महामार्गावर फ्रेन्डस राजस्थानी दालबाटी हॉटेलच्या पार्किंग दरम्यान मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास टँकर सापळा रचून पकडला. अहमदाबाद पोलिसांनी टँकर तपासणी केली असता भरगच्च दारूने भरलेला टँकर पोलिसांना आढळून आला. साधारण २८ लाखांची दारु या कारवाईत जप्त करण्यात आली. या कारवाईत रितेश प्रभात चौधरी (रा. देवगड गाव, टेकरी फळीया ता. मांडवी जिल्हा सुरत) या चालकाला अटक केली.

टँकरमध्ये भारतीय बनावटीची विदेशी दारू लहान मोठ्या सात हजार १३८ बॉटल टँकरमध्ये भरलेल्या आढळून आल्या. दारूची एकूण किंमत २८ लाख ४१ हजार २०० रुपयांची दारू, वाहनाची किंमत १५ लाख, १३ हजार ८७० ची रोकड, ५०० रुपयांचा मोबाईल फोन, एकूण ४३ लाख ५५ हजार ५७० मुद्देमाल जप्त केला आहे.

नवापूर नगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विश्वास भीमराव बडोगे रा. देवलफळी नवापूर,कमलेश (मारवाडी) मीठालाल खत्री रा नवापूर, नितीन पाटील रा. नवापूर, संजय अशोक देवरे रा. नवसारी, जिल्हा नवसारी यांच्यावर गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार संशयित आरोपी फरार आहेत. गुजरात पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details