नंदुरबार - जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातून सुमारे १७ हजार विद्यार्थी या वर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील २३ केंद्राांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. संवेदनशील परिक्षा केंद्रांवर कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
बारावीच्या परिक्षेला सुरुवात; १७ हजार विद्यार्थी देणार परीक्षा - बारावी परिक्षा
जिल्ह्यातून सुमारे १७ हजार विद्यार्थी या वर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत.
नंदुरबार
तसेच परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वर्षी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ऐन वेळेस पर्यवेक्षकांची बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.
नंदुरबार जिल्हा सामूहिक कॉफीसाठी बदनाम आहे. हा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या उपाययोजना कितपत उपयोगी ठरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.