नंदुरबार -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान ही परीक्षा होईल. आजपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील 24 परीक्षा केंद्र सज्ज झाले आहेत. तसेच 24 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातून एकूण 16 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
राज्यात आजपासून बारावीची परिक्षा... पहिल्याच दिवशी मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची लगबग हेही वाचा...बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 403 विद्यार्थी देणार परीक्षा
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियानाची जोरदार तयारी केली आहे. 24 बैठे पथक तर बारा भरारी पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात परीक्षा कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत परीक्षा केंद्रावर बाहेरच्या व्यक्तीने येउन मदत कल्याचे आढळेल, त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे.