नंदुरबार - जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात नंदुरबार व शहादा येथे सावित्रीबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा आजची सावित्री म्हणून सन्मान करण्यात आला व आदर्श शिक्षिका व शिक्षक पुरस्कार देखील वितरित करण्यात आले.
नंदुरबार : आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान - आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबारमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा आजची सावित्री म्हणून सन्मान करण्यात आला व आदर्श शिक्षिका व शिक्षक पुरस्कार देखील वितरित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई व महात्मा फुले यांना अभिवादन -
नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात असलेल्या सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या वतीने व समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील व परिसरातील नागरिकांनी यावेळी अभिवादन केले.
Last Updated : Jan 3, 2021, 3:13 PM IST