नंदुरबार- सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये डफचा ताल आणि घुंगराचा साद घुमण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी आजपासून मानाच्या आणि नवसाच्या होळी सणाला सुरूवात झाली. होळीच्या पारंपरिक उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सकाळी नवसाची होळी पेटवली जाते.
नंदुरबारमध्ये मानाच्या अन् नवसाच्या होळी सणाला सुरूवात
या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होत असतात. यात अनेक प्रकारच्या वेशभूषा केल्या जातात
होळी सणाला सुरूवात
या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होत असतात. यात अनेक प्रकारच्या वेशभूषा केल्या जातात. डोक्यावर मोराच्या पिसांचा घातलेला टोप, कंबरेला भोपळे बांधलेल्या बुध्या तर कंबरेला घुंगरू बांधलेला बावा आणि महिलेच्या रुपात असलेल्याला धनका डोको असं म्हणतात. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आठ दिवस होळीची धूम पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला आदिवासी होळीचा आनंद घ्यायचा असेल तर निश्चित या सोहळ्यात सहभाग घ्यावा.