नंदुरबार -जिल्ह्यातील सर्वात मोठी 'राजवाडी होळी' काठी गावात जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने साजरी केली. डोक्यावर मोरपिसांचा तुरा कमरेला व पायाला घुंगरू बांधून अंगावर रंगरंगोटी करून मोरक्या, बुध्या, बावा पेहराव करून पारंपारिक वाद्य ढोल, डफ, बासुरी वाजवत रात्रभर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजता होळी पेटवण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावात ऐतिहासिक 'राजवाडी होळी' उत्साहात साजरी - Nandurbar district
काठी येथील राजवाडी होळी साजरी करण्यासाठी हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. होळी सणासाठी आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने एक महिना पथ्य पाळून तयारी करत असतात.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावात ऐतिहासिक 'राजवाडी होळी' उत्साहात साजरी
काठी येथील राजवाडी होळी साजरी करण्यासाठी हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. होळी सणासाठी आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने एक महिना पथ्य पाळून तयारी करत असतात. होळी हा सण आदिवासी समाजाला जगण्याचे नवीन सामर्थ्य ऊर्जा प्रदान करतो असा विश्वास ठेवत होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.