महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाहा व्हिडिओ.. नंदुरबारमध्ये जोरदार पावसाने डांबरी रस्ताच गेला वाहून

नवापूर तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. नवापूर खांडबारा रस्त्यावरील डोकारे पुल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहून गेला आहे. जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफोल झाली आहे.

By

Published : Aug 6, 2019, 10:40 AM IST

Updated : Aug 6, 2019, 7:47 PM IST

नंदुरबारमध्ये जोरदार पावसाने ग्रामीण भागातील रस्ते गेले वाहून

नंदुरबार- येथील नवापूर तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. नवापूर खांडबारा रस्त्यावरील डोकारे पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहून गेला आहे. जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहे.

नंदुरबारमध्ये जोरदार पावसाने ग्रामीण भागातील रस्ते गेले वाहून

गुजरात व महाराष्ट्र राज्याला जोडणारा चंदापूर बिलबारा रस्त्यावरील पूल संपूर्ण वाहून गेल्याने दोन्ही, राज्यांचा संपर्क तुटला आहे. दोन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफोल झाली आहे. गुजरात राज्यात जाणारे रस्ते पाण्यात वाहून गेलेत. दक्षिणेकडील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या अहवा डांग जिल्ह्यातील रस्त्यावर दरड पडून रस्ता खचून गेल्याने डांग जिल्ह्यात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. उच्छलकडे जाणारा रस्त्यावर देखील खाखरफळी भागात पाणी साचल्याने संपर्क तुटला आहे.

Last Updated : Aug 6, 2019, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details