नंदुरबार -जिल्हा स्वतंत्र होऊन २१ वर्ष पूर्ण झाली. मात्र, तरीही विविध विभागांची कार्यालये नंदुरबारमध्ये स्थापन झालेली नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय. आता नंदुरबार मध्ये या कार्यालयाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाच्या सहआयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाची सुरुवात - maharashtra goverment
नंदुरबार जिल्हा स्वतंत्र होऊन २१ वर्ष पूर्ण झाली. मात्र, तरीही अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय स्थापन झालेले नव्हते. नागरिकांनी आता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या परवान्यासाठी आणि तक्रारीसाठी नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान सहआयुक्तांनी केले आहे.
नंदुरबार मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाची सुरुवात
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाची सुरुवात झाली आहे. नागरिकांनी आता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या परवान्यासाठी आणि तक्रारीसाठी नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान सहआयुक्तांनी केले आहे.