महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंपाजवळील गॅरेज मधील वाहनांना आग, लाखोंचे नुकसान

पेट्रोल पंपाजवळील गॅरेज मधील दुरुस्तीसाठी आलेले चारचाकी वाहन व टायर दुकानातील विक्रीला असलेल्या जुन्या टायरला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. मात्र, वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

By

Published : Dec 28, 2019, 11:45 PM IST

वाहनांना लागलेली आग
वाहनांना लागलेली आग

नंदुरबार- नवापूर शहरातील हायवे लगत असलेल्या स्वस्तिक पेट्रोल पंपाजवळील गॅरेज मधील दुरुस्तीसाठी आलेले चारचाकी वाहन व टायर दुकानातील विक्रीला असलेल्या जुन्या टायरला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. टायरला लागलेल्या आगीमुळे जवळच असलेल्या गॅरेजमधील चार वाहनांना आग लागली. यात वाहने जळून खाक झाली आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाजवळच पेट्रोल पंप आहे, वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चारचाकी गाडीची काच फोडून वाहन बाजूला करून आगी पासून वाचवण्यात नागरिकांना यश आले. या वेळी नागरिकांनी नगर परिषदेचा अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी नगर परिषदेच्या टोल फ्री क्रमांक आणि पंप हाऊसवरील क्रमांक लावले असता दोन्ही क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले होते. स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली असून वेळेवर अग्निशमन बंब उपलब्ध होऊ शकला नसल्याने नुकसान मोठया प्रमाणावर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय सैन यांनी अग्निशमन वाहनावरील चालकाच्या वैयक्तिक मोबाईलवर संपर्क करून बोलावले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी चार वाहने आणि विक्रीसाठी असलेले टायर जळून खाक झाल्याने 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


आगीचे कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून वेडसर व्यक्ती कडाक्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून बसली होती. त्यामुळेच आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा - सूर्य ग्रहणावेळी नमाज पठण करत मुस्लीम बांधवांची शांततेसाठी प्रार्थना

ABOUT THE AUTHOR

...view details