नंदुरबार- शहादा शहरातील पपई खरेदी विक्री करणाऱ्या रफिक बागवान यांच्या गोदामामध्ये पपई साठी वापरले जाणाऱ्या गवताला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता. संचारबंदी असल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
शहाद्यात पपई वाहतुकीसाठी वापरणाऱ्या गवताच्या गोदामाला आग; दोन लाखाचे नुकसान
पईला गाडीमध्ये भरताना आजुबाजूला गवत लावले जाते ते गवत रफिक बागवान यांच्या गोदामात होते. मात्र, आगीत गवत जळून बागवान यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली जाते. मात्र, सध्या कोरोना विषाणूमुळे राज्यात संचारबंदी असल्यामुळे पपई व्यापार बंद आहे. पपईला गाडीमध्ये भरताना आजुबाजूला गवत लावले जाते. ते गवत रफिक बागवान यांच्या गोदामात होते. बागवान हे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपई विक्री करतात. मात्र, लॉकडाऊन असल्याने त्यांचे साहित्य गोदामामध्ये पडून होते.
गोदामामधील गवताला आग लागून मोठे आगीचे लोळ उठायला लागले. परिसरातील नागरिकांना ही घटना लक्षात आली.नागरिकांनी शहादा नगरपालिका अग्निशामक दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले. आगीत झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला.