महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये वृद्धाने भाजपच्या प्रचारासाठी निवडला 'हा' मार्ग, गुन्हा दाखल - election period

नंदुरबारमधील नवनाथनगर वसाहतीतील एकनाथ मोतीराम चौधरी (वय ६५) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स आणि पक्षाचे कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होते.

नंदुरबारमध्ये वृद्धाने भाजपच्या प्रचारासाठी निवडला 'हा' मार्ग

By

Published : May 2, 2019, 7:39 PM IST

नंदुरबार- मतदानाच्या दिवशी कुत्र्यासोबत मोदींचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया काही नवीन नाहीत. कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकालादेखील ताब्यात घेतले आहे.

२८ एप्रिलला मतदानाच्या दिवशी नंदुरबारमधील नवनाथनगर वसाहतीतील एकनाथ मोतीराम चौधरी (वय ६५) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स आणि पक्षाचे कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होते. 'मोदी लाओ, देश बचाओ' असे घोषवाक्य कुत्र्याच्या शरीरावर असलेल्या स्टिकरवर लिहिले होते. त्यानंतर चौधरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान सुरू असतानाही प्रचार केल्याप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. चौधरी यांची मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details