नंदुरबार - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात पेरणी होईल, असा समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरणीसाठी उशीर होत होता. मात्र तग धरलेल्या पावसाने गुरूवारी सकाळी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे समाधानाचे वातावरण पहायला मिळाले.
दडी मारलेल्या पावसाची अखेर नंदुरबारमध्ये दमदार हजेरी - farmer
नंदुरबार येथे जून महिन्यात पेरणी होईल, असा समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरणीसाठी उशीर होत होता. मात्र तग धरलेल्या पावसाने गुरूवारी सकाळी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले.
नंदुरबार फ्लॅश जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच समाधान कारक पावसाची सुरुवात
जुनचा पहिला पंधरवाडा वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती, मात्र वरुण राजाने नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे येथील शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण हाते. जून महिना कोरडा गेला. मात्र, गुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आणि शेतकरी सुखावला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात केवळ 20 टक्के पेरण्या झाल्या होत्या. आता सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
Last Updated : Jul 6, 2019, 11:11 AM IST