नंदुरबार - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडगाव तालुक्यातील 99 गावे आणि 163 पाड्यांना या पावसाचा फटका बसला होता. काही गावातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाले आहेत. मात्र, पंचनाम्यांना गती देण्याची अपेक्षा असताना अजूनही 35 गावे आणि 100 च्या जवळपास पाड्यांचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. म्हणून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; पंचनामे करण्याची मागणी हेही वाचा -संगमनेरच्या जवानाचा अपघाती मृत्यू; दिवाळी सुट्टीसाठी आल्यावर घडली घटना
पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी आतापर्यंत तालुक्यातील 943 हेक्टर क्षेत्रांचा पंचनामा केला आहे. त्यानंतरही तालुक्यातील 35 गावांमध्ये पंचनामे झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार समोर आली आहे. म्हणून अतिदुर्गम आणि दुर्गम भागातील पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गाव पाड्यापर्यंत पोहोचत शक्य नसल्याने या गावातील पंचनामे झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -अमरावती : मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी मदरशातील 'त्या' शिक्षिकेला अटक