नंदुरबार- नंदुरबार लोकसभा मतदारसंघसाठी निवडणुकीच्या ४ थ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल्कुवा, धडगाव, शहादा, नंदुरबार, नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर, अशा एकूण ६ विधानसभा मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.
नंदुरबारमध्ये मतदानाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
नंदुरबार लोकसभा मतदारसंघसाठी निवडणुकीच्या ४ थ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
या ठिकणी १८ लाख ७० हजार ११७ इतकी मतदारांची संख्या आहे. तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
येथे प्रशासनाच्यावतीने एकूण १० हजार ४७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना रविवारी मतदान साहित्यांचे वाटप करून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा आणि धडगाव या अतिदुर्गम भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरेशी नसल्यामुळे संवाद यंत्रणा तयार करण्यात आली आहे. दर दोन तासांनी मतदानाची माहिती घेण्यासाठी रनरची मदत घेण्यात येणार आहे.