महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंप चालकांकडून खबरदारी; येणाऱ्या ग्राहकांवर निर्जंतुकीकरण फवारणी - Disinfection at petrol pump

येथील पेट्रोलपंपमालक स्वखर्चाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

Disinfection on petrol pump in nandurbar
पेट्रोल पंप चालकांकडून खबरदारी; येणाऱ्या ग्राहकांवर निर्जंतुकीकरण फवारणी

By

Published : Apr 19, 2020, 9:19 AM IST

नंदुरबार -शहराबाहेर असलेल्या धुळे रस्त्यावरील नवकार पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वाहनावर आणि ग्राहकांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. सोडियम हायड्रोक्वोलाईडची फवारणी करून हे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

येथील पेट्रोलपंपमालक स्वखर्चाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात कोरोनाबाधित उघडल्यानंतर शहरातील नागरिक योग्य ती खबरदारी घेत असून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत आहे. नगरपालिकेमार्फत शहरातील विविध भागात फवारणी केली जात आहे. तसेच शहरातील पेट्रोलधारक देखील खबरदारीचा उपाय म्हणून आलेल्या ग्राहकांवर सोडियम हायड्रोक्वोलाईडची फवारणी केल्यानंतर त्यांना पेट्रोल किंवा डिझेल देत आहेत.

येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य ती खबरदारी म्हणून मास्क लावणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर त्यांना पेट्रोल देण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details