नंदुरबार - कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी भारतीयांची एकजुट आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत कोरोनाला हरविण्यासाठी घरातील लाईट पूर्णपणे बंद करून घराच्या दारातून दिवे, मेणबत्त्या, टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद देत घराच्या दारात व गॅलरीत येवून दिवे, मेणबत्त्या मोबाईलचे टॉर्च लावुन काळोख्या अंधारात प्रकाशमय करुन कोरोनाला हरविण्यासाठी संकल्प केल्याचे दिसून आले.
काळोख्या अंधारात प्रकाशमयाने कोरोनाला हरवण्याचा संकल्प; नरेंद्र मोदींच्या आवाहनाला नंदुरबारकरांचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने दि.5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेला 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील लाईट बंद करुन घराच्या दारात व गॅलरीत दिवे, मेणबत्ती व टॉर्चचा प्रकाश करुन कोरोनाचा सामना करण्याचे आवाहन केले होते.
जगासह देशात कोरोना विषाणुने थैमान घातला आहे. देशासह राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरीने कोरोना विषाणुला रोखण्यासाठी प्रयत्न करित आहेत. त्यामुळे देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर विनाकारण येवु नये, यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. कोरोना या महाभयंकर संसर्ग विषाणुचा सामना करण्यासाठी भारतीयांनी एकजुट दाखविणे गरजेचे आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने दि.5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेला 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील लाईट बंद करुन घराच्या दारात व गॅलरीत दिवे, मेणबत्ती व टॉर्चचा प्रकाश करुन कोरोनाचा सामना करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला संपूर्ण भारतीयांनी प्रतिसाद देत घरोघरी, दारोदारी दिवे, मेणबत्त्या पेटवुन प्रकाशमयातुन एकजुटता दाखविली. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी रात्री 9 वाजेला घरातील लाईट पूर्णपणे बंद करुन घराच्या दारात दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावुन काळोख्या अंधारात दारातुनच प्रकाशमय घडवित कोरोना विषाणुला हरविण्यासाठी एकजुटता दाखवित संकल्प केला. यामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात प्रत्येक वसाहत, चौक, गल्लीबोळात घरोघरी, दारोदारी नागरिकांनी दिवे, मेणबत्त्या लावुन प्रकाशमय करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.