नंदुरबार - पावसाळ्याचा पहिल्या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 35 टक्के पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांसह लघु प्रकल्प व व धरणे संपूर्ण भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दूर होणार आहे. नंदुरबारमधील सर्व प्रमुख धरण प्रकल्प भरल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नंदुरबार आणि नवापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा - percipitation in nandurbar
नवापूर शहरला पाणी पुरवठा करणाऱ्या रंगवलीमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे. पावसाळ्याचा पहिल्या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 35 टक्के पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण वाढल्याने सर्व धरणे भरली आहेत.
जिल्ह्यात पावसाळा दोन महिन्यांपर्यंत पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. यामुळे दुबार पेरणीचे संकट समोर होते. याचसोबत धरणे आणि अन्य पाणीसाठ्यांमधील पाण्याची पातळी खालवली होती. अशा वेळी खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट होते. मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात संततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या नंदुरबार, नवापूर, शहादा शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक आणि आंबेबारा प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे नंदुरबारवासियांना दिलासा मिळाला आहे.
नवापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रंगवलीमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे. त्याच सोबत धरणात पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.