नंदुरबार- नवापुरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्रज्ञान व्यवस्थापकाला शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शासकीय योजनेमार्फत शेतकरी उत्पादक गटाला मोफत बियाणं वाटप करण्यात येणार होते. या बि-बियाणे व निर्विष्ठांच्या बदल्यात आठ हजारांची लाच संबंधित व्यवस्थापकाने मागितली होती. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच अशा प्रकारे लूट होत असल्याने बळीराजाच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवापूरमध्ये शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्याला व्यवस्थापकास अटक - नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
नवापुरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्रज्ञान व्यवस्थापकाला शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शासकीय योजनेमार्फत शेतकरी उत्पादक गटाला मोफत बियाणं वाटप करण्यात येणार होते. या बि-बियाणे व निर्विष्ठांच्या बदल्यात आठ हजारांची लाच संबंधित व्यवस्थापकाने मागितली होती. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे.
शेतकर्यांसाठी मोफत बि-बियाणे व खते देण्याची योजनाशासनाने सुरू केली. नवापूर तालुक्यातील पिंपराण येथील तक्रारदार शेतकरी हे समृद्ध शेती उत्पादक गटाचे अध्यक्ष आहेत. या योजनेच्या लाभासाठी अधिकाऱ्याने कायदेशीर नोंदी करून स्थापन केलेल्या गटामार्फत यादीतील शेतकर्यांना बि-बियाणे व खते मिळण्याची मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती.
यादीनुसार बियाणांचे मोफत वाटप झाले. परंतु बियाणे वाटप केल्याबद्दल नवापूर तालुका कृषी कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक योगेश वामनराव भामरे यांनी तक्रारदाराकडे 16 शेतकर्यांमागे प्रत्येकी 250 प्रमाणे म्हणजेच 4 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच न दिल्यास पुढील रब्बी हंगामात पिकांचे बियाणे मोफत मिळू देणार नसल्याचेही सांगितले. याबाबत गटाचे अध्यक्ष यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यावरून लाचलुचपत विभागाने भामरे याला 8हजार 750 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.