नंदुरबार -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नंदुरबार जिल्हा रेड झोनकडे मार्गस्थ होताना दिसत आहे. नंदुरबार येथे चार, शहादा येथे चार तर अक्कलकुवा येथे तीन असे जिल्ह्यात एकूण 11 रुग्ण कोरोना बाधित असून शहादा येथील एकाचा मृत्यू झाला आहे. शहादा येथील सुमारे १,२५० नागरिकांची तपासणी केली असून अक्कलकुवा येथे देखील नागरिकांची तपासणी सुरू आहे.
नंदुरबार जिल्हा रेड झोनकडे मार्गस्थ..! कोरोनाबाधितांची संख्या 11 वर, एकाचा मृत्यू - नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नंदुरबार जिल्हा रेड झोनकडे मार्गस्थ होताना दिसत आहे.जिल्ह्यात एकूण 11 रुग्ण कोरोना बाधित असून शहादा येथील एकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने रुग्ण तपासणीसाठी पथके गठित केली असून आतापर्यंत हजारो नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून अनेकांचे अहवाल प्रलंबित आहेत.
शहादा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तिघांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहिम प्रशासनाने सुरू केली आहे. शहरासह तालुक्यातील 26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात काहींचे अहवाल प्राप्त झाल्याने शहादा येथील माता-पुत्राला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखीन दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
मृत कोरोनाबाधित युवकाच्या मित्राला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. कोरोनाबाधितांच्या निकटवर्तीयांचे नमुने तपासणीसाठी नंदुरबारला पाठविण्यात आले असून शहरातील प्रभाग क्र. 7 मधील 1 हजार 250 कुटुंबांची सलग तीन दिवस तपासणी करण्यात येत आहे.
अक्कलकुवाकरांची चिंता वाढली; दोन कोरोनाबाधितांची भर
अक्कलकुवा शहरात आणखीन कोरोनाचे 2 महिला रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 23 वर्षीय तरुणी व 48 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने उर्वरित 17 व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. असे असले तरी अक्कलकुवा शहरात कोरोनाबाधितांची संख्या 3 झाली असून शहरवासियांची चिंता आणखीनच वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा येथील एक शिक्षक दाम्पत्य मालेगाव येथून आल्याने त्यांच्या कुटूंबातील पाच व्यक्तींना तपासणीसाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले होते. त्यातील एका 32 वर्षीय महिला शिक्षिकेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने अक्कलकुव्यात कोरोनाचा रूग्ण आढळला होता. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील 19 व्यक्तींना तपासणीसाठी नंदुरबार येथे पाठवले होते. तर अन्य दोघांना अक्कलकुवा येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. 19 व्यक्तींच्या तपासणीनंतर अक्कलकुवा येथील नवोदर विद्यालरात त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्रात आले आहे. या व्यक्तींच्या तपासणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून अक्कलकुव्यातील एक 23 वर्षीय तरुणी व 48 वर्षीय महिला या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. तर उर्वरित 17 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या बाधित दोघांना लागलीच सकाळी नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. खबरदारीचा उपार म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असून त्या भागातील सुमारे 650 कुटुंबातील 2022 व्यक्तींच्या तपासणीसाठी 14 आरोग्य पथके गठित केली आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधित 10 रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे तरी नागरिकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे असे आव्हान प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.