नंदुरबार- शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. खबरदारी म्हणून तीन दिवसांसाठी शहादा शहरातील वैद्यकीय सेवा सोडून लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या सर्व सेवा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहादा नगरपालिकेतर्फे तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन - curfew
नंदुरबार शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहादा नगरपालिकेने तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने नंदुरबार शहरात कोरोनाबाधित रुग्ण घडल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहो. यापार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेच्या वतीने तीन दिवस लॉकडाऊन घोषित केले असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद राहील. शहरतील भाजीपाला मार्केट, किराणा दुकान, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहेत. या काळात संचारबंदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शहादा शहरात नगरपालिकेच्यावतीने अनेक भागात बॅरिकेट लावण्यात आले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.