नंदुरबार - समस्त लेवा पाटीदार समाज आणि विविध ग्राम, शहर लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे गुजर समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
नंदुरबारमध्ये गुजर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा - नंदुरबार
समस्त लेवा पाटीदार समाज आणि विविध ग्राम, शहर लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे गुजर समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
नंदुरबारमध्ये गुजर समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा
सामाजिक भान ठेवत २००९ पासून या मंडळाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. समाजातील गरीब घटकांना मुलीचे लग्न अत्यंत कमी खर्चात करणे शक्य व्हावे, त्यासोबत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवण्यासाठी हा विवाह सोहळा आदर्श ठरणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Apr 20, 2019, 9:05 PM IST