महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2020, 7:09 PM IST

ETV Bharat / state

संतप्त मिरची उत्पादकांची बाजार समिती कार्यालयावर धडक; अखेर लिलाव सुरू

मार्केट यार्डमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्याने संतप्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी लिलावाची मागणी केली. त्यामुळे अर्धा तास गोंधळाचे वातावरण होते. अखेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरळीत झाली.

nandurbar chilly production
संतप्त मिरची उत्पादकांची बाजार समिती कार्यालयावर धडक; अखेर लिलाव सुरू

नंदुरबार - मार्केट यार्डमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्याने संतप्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी लिलावाची मागणी केली. त्यामुळे अर्धा तास गोंधळाचे वातावरण होते. अखेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मध्यस्ती केल्यानंतर पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरळीत झाली.

संतप्त मिरची उत्पादकांची बाजार समिती कार्यालयावर धडक; अखेर लिलाव सुरू

हमाल मापाडी यांची तोलाईतचा दरात प्रत्येक दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते. यंदा ३१ ऑक्टोबर ही त्यांची मुदत संपली आहे. अद्याप त्यांना नवीन दर मिळालेला नाही. त्यामुळे हमाल मापाडी युनियनने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे.

मार्केट यार्डमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्याने संतप्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक दिली.
मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक
मार्केट यार्डात १०० ते १५० ट्रॅक्‍टर मिरची व २० ते ३० वाहनांमधून भुसार मालाची आवक झाली. हमालीचे काम बंद असल्याने लिलाव प्रक्रिया बंद आहे. सध्या परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे मिरचीचे नुकसान होऊ नये म्हणून मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडे केली. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक दिली.
सभापती व व्यापाऱ्यांची बैठक

शेतकऱ्यांसमवेत सभापती दिनेश पाटील, सचिव योगेश अमृतकर यांनी बैठक घेतली. बैठकीत लिलाव प्रक्रिया सुरू करण्याच्या कुठलाही निर्णय झाला नाही. त्यानंतर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यापारी, शेतकरी व हमाल मापाड्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. यावेळी तिन्ही शिष्टमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. मार्केट यार्डमध्ये आलेल्या मालाचा लिलाव सुरू करावा. यामुळे मालाचे नुकसान होणार नाही. लवकरच अंतिम तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिल्यानंतर दुपारी प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details