नंदूरबार - 'वारी लालपरी'ची या अभियानाअंतर्गत "बस फॉर अस" फाउंडेशनने तयार केलेली विशेष बस शहरात काल शुक्रवारी दाखल झाली. परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ आणि जिल्ह्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी या बसचे स्वागत केले.
'लालपरी'चा इतिहास सांगणारी एस टी बस नंदुरबारमध्ये दाखल - arrives
वारी लालपरीची या अभियानाअंतर्गत "बस फॉर अस" फाउंडेशनने तयार केलेली विशेष बस नंदुरबार शहरात काल शुक्रवारी दाखल झाली. परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ आणि जिल्ह्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी या बसचे स्वागत केले.
लालपरीच्या स्थापनेपासून व बसच्या नूतनीकरणासह गेल्या सत्तर वर्षात लालपरीत झालेल्या इतिहासाची माहिती या विशेष बस मधून नागरिकांना दिली जात आहे. त्यासोबतच महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही माहिती या बसमधून प्रसिद्ध केली जात आहे. या विशेष बसमध्ये लालपरी चा इतिहास आणि त्याबद्दलची अधिक माहिती असल्याने बसला पाहण्यासाठी प्रवाशांमध्ये देखील उत्सुकता दिसून आली.
आज लालपरीला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही जिल्ह्याला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही दुर्गम भागात आणि खेड्यापाड्यात रस्ते नसल्याने लालपरी अजूनही पोहोचू शकलेली नाही त्यामुळे या लालपरीचा इतिहास दुर्गम भागात पोहचू शकलेला नाही.