नंदुरबार - महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील सापुतारा येथे घाट परिसरात आज सकाळी एका बसचा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात असलेल्या झाडामध्ये जाऊन अडकली.
नंदूरबार : सापुतारा घाटात झाडामुळे वाचले बसमधील ५० प्रवाशांचे प्राण - accident
सापुतारा घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला, यामुळे हा अपघात झाला.
रविवारी सकाळी ही बस गुजरातहून शिर्डीकडे जात होती. बस सापुतारा येथे आली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट घाटात असलेल्या झाडामध्ये जाऊन अडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घाटामध्ये वळणाचा रस्ता असल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले. बस घाटात पडत असताना परिसरातील मोठ्या झाड्यात जाऊन अडकली. त्यामुळे मोठा अपघात टळला. स्थानिक नागरीक आणि प्रशासनाच्या मदतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.