नंदुरबार - बीएसएनएलने टेलिफोन एक्सचेंज कार्यालयांचे वीज बील न भरल्याने जिल्ह्यातील अनेक टेलिफोन एक्सचेंजचा वीज पुरवठा विद्युत वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्याचा परिणाम बीएसएनएलच्या मोबाईल आणि इंटरनेट सेवेवर झाला असून ग्रामीण भागातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
बीएसएनएलचे वीज बील थकले, मोबाईलसह इंटरनेट सेवेवर मोठा परिणाम हेही वाचा - शेअर बाजारात पडझड सुरुच; विक्रीच्या दबावातून ४८६ अंशाची घसरण
प्रकाशा येथील बीएसएनएल कार्यालयाचे वीज बील न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गावातील स्टेट बँक, पोस्ट ऑफिस यासह विविध शासकीय कार्यालयांचा ऑनलाइन कारभार ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील बँका ओस पडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपले व्यवहार पूर्ण करावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहक संतापल्याचे दिसत आहे.
बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसत आहे. त्यामळे याची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन ऑनलाइन कारभारासाठी दुसऱ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - यंदाचा 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्कार मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना...!