नंदुरबार - पालिकेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस युतीची सत्ता आहे. मात्र, तरी देखील पालिकेच्या युतीला बाजूला सारत भाजप-शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढणार, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष खासदार हिना गावित आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार - हिना गावित
नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष खासदार हिना गावित आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष आमशा पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
खासदार हिना गावित आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष आमशा पाडवी
स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. मात्र, लोकसभेसाठी दोन्ही पक्षात युती झाल्यामुळे या मतभेदांना पूर्णविराम देण्यात आला आहे. त्यामुळेच येथून पुढे सर्वच निवडणुका शिवसेना-भाजप युतीने लढू, अशी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली.