नंदुरबार - दिल्ली येथे आयोजित भारत बचाओ रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध नोंदविण्यात आला आहे.
राहुल गांधी यांचा भाजपतर्फे निषेध दिल्ली येथील भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी राहुल सावरकर नाही, असे खोचक वक्तव्य करत राहुल गांधी यांनी भाषणातून सावरकरांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. अशा महापुरुषाबद्दल काँग्रेसचे राहुल गांधी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य करणे निषेधार्थ आहे.
हेही वाचा -लोकअदालीत 710 प्रकरणे निकाली, दीड कोटींची वसुली
नंदुरबार येथे भाजपच्या वतीने काँग्रेसचे राहुल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजप जिल्हा चिटणीस माणिक माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, कामगार आघाडीचे अशोक चौधरी, दिनेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भरत लोहार, बाबुलाल माळी, निर्मल शर्मा, जयेश चौधरी, प्रकाश चौधरी, सुदाम पटेल, विठ्ठल चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - चेतक महोत्सवामध्ये १ कोटींची उलाढाल, यंदा नवा विक्रम यंदा होण्याची शक्यता