महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 16, 2021, 4:41 PM IST

ETV Bharat / state

नवापुरनंतर गुजरातच्या उच्छलमध्ये बर्ड फ्लूची लागण

नवापूर तालुक्यातील 22 पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच 5 एन 8 विष्णाणू बाधित होते. नवापूर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच 5 एन 1 आला आहे.

bird flu found in ucchal gujarat after navapur
नवापूरनंतर गुजरातच्या उच्छलमध्ये बर्ड फ्लूची लागण

नंदुरबार - नवापुरात बर्ड फ्लूचे कलिंग ऑपरेशन संपत नाही, तोपर्यंत शेजारील गुजरात राज्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर नवापूर बर्ड फ्ल्यूपेक्षा गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीची तीव्रता अधिक असल्याचे अहवालामध्ये दिसून येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत तहसिलदार माहिती देताना.

नवापूर तालुक्यातील 22 पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच 5 एन 8 विष्णाणू बाधित होते. नवापूर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच 5 एन 1 आला आहे. मात्र, या पोल्ट्रीतील संचालक अनीस टिमोल यांनी सांगितले आहे की, आमच्या पोल्ट्रीत पक्ष्याची मरतूक नाही आहे. गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी नियमित तपासणी करीत आहे. आमच्या अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तापी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करणार आहे, अशी माहिती दिली.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून पाहणी -

नेशनल पोल्ट्री नजिक महाराष्ट्रातील एक किलोमीटर परिसरात किती पोल्ट्रीत येतात याची पाहणी करून पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांसह चर्चा करून पुढील कलिंग ऑपरेशन ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाजीत असलेल्या पोल्ट्री फार्म सिलिंग करून बंदोबस्त लावण्याचे काम देखील करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

गुजरात राज्यातील उच्छलमध्ये पुन्हा बर्ड फ्लू -

गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीत 1972 साली सुरू करण्यात आली आहे. नवापूर परिसरातील सर्वांत जुनी पोल्ट्रीत आहे. यात एकूण 17 हजार कुकुट पक्षी आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुजरात राज्यातील पथक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून गुजरात मधील पोल्ट्री फार्मला बंदोबस्त -

नवापूरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने गुजरात राज्यातील सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या संदर्भात उच्छल पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. उच्छल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने पोलिस बंदोबस्त दिला होता. गुजरात राज्यात बर्ड फ्लू लागण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात आली. मात्र, गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांकडून काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. नवापूर तालुक्यात फेब्रुवारी 2006 नंतर दुसर्‍यांदा 6 फेब्रुवारी 2021ला बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन नवापूरातील २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले.

तापी व डांग जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद -

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुजरात राज्यातील तापी व डांग जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना नवापूरच्या संदर्भात खबरदारी म्हणून माहिती देण्यात आली होती. त्यानंतरदेखील गुजरात राज्यात बर्ड फ्लू शिरकाव झाला.

पाच लाखांपेक्षा अधिक कुकुट पक्षी नष्ट -

यात एकूण पाच लाख 78 हजार 890 कुकुट पक्षी नष्ट केले. तर 25 लाख 13 हजार 392 अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील कलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details