नंदुरबार -नवरात्र उत्सवानिमित्त बाजारात फुलांची मोठी मागणी असते. फुलांच्या मार्केटमधून दरवर्षी मोठी उलाढाल होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी फुलांची शेती करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मंदिर आणि यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवांवरील बंदीमुळे फूलउत्पादक अडचणीत - नवरात्र उत्सव
नवरात्र उत्सवानिमित्त बाजारात फुलांची मोठी मागणी असते. फुलांच्या मार्केटमधून दरवर्षी मोठी उलाढाल होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मंदिर आणि यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोनाचे सावट दूर होऊन नवरात्रोत्सव आणि यात्रांचा हंगाम सापडेत. त्यात फुलांची विक्री होईल, अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची शेती केली. मात्र ऐन उत्पादन निघण्याच्या काळामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसानं झाले आहे. त्यात भरीस भर म्हणून राज्यात अद्याप कोरोना संकट दूर झाले नसल्याने, सरकारने सर्व यात्रा आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने फुलांची मागणी घटली आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गुलाब, मोगरा, झेंडूसह ग्लॅन्डर फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील फुले गुजरात राज्यात विक्रीसाठी जातात. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे नंदुरबार शहरासह, आष्टे, शनिमांडळ, तळोदा, शहादा, निजामपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. फुलांना बाराही महिने मागणी असते. फुलांची मागणी लक्षात घेता गुलाबाचे फारसे उत्पादन होत नाही. येथील हवामान पोषक नसल्याने गुलाबाची शेती कमी प्रमाणात केली जाते. मात्र शिर्डी, नगर, पुणे परिसरातील गुलाब मोठ्या प्रमाणात येथील विक्रेते खरेदी करतात. त्यामुळे फुल व्यवसायाला तेजी असते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि कोरोना याचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.