महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बामखेडा गाव पाच दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन; बाधिताच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी रवाना - nandurbar lockdown

शहादा तालुक्यातील बामखेडा गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून बामखेडा गाव पाच दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

corona
बामखेडा गाव पाच दिवस संपूर्ण लॉकडाऊन; बाधिताच्या कुटूंबियांचे नमुने तपासणीसाठी रवाना

By

Published : May 17, 2020, 12:05 PM IST

शहादा (नंदुरबार) -तालुक्यातील बामखेडा येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव पुढील पाच दिवस बंद ठेवले आहे. गावालगतचा एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, संबंधित रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या 100 मीटर परिसर सील केला आहे. दरम्यान, बाधिताच्या कुटुंबातील निकटवर्तीयांना तसेच त्याच्यावर उपचार करणारे तीन स्थानिक डॉक्टर अशा एकूण 27 जणांना शहाद्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बामखेडा गाव पाच दिवस संपूर्ण लॉकडाऊन; बाधिताच्या कुटूंबियांचे नमुने तपासणीसाठी रवाना

बामखेडा येथील मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त एक रुग्ण नाशिक रेथे उपचार घेत होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाला बामखेड्यातून ९ मे रोजी नाशिकला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. गेल्या महिन्याआधी त्याच्यावर इतर तीन खासगी डॉक्टरांनी उपचार केले होते. प्रशासन त्या बाधित रुग्णाचा प्रवास इतिहास तपासत आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांची प्रशासनाद्वारे तपासणी केली जात आहे. संपर्कातील 27 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रुग्ण राहत असलेला बामखेडा येथील मिरानगर वसाहत बॅरीकेट्स लावून सील करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी म्हणून पूर्ण गावात दोन वेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. घरोघरी सॅनिटाईजर आणि साबण वाटप करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत.

यावेळी शहाद्याचे प्रातांधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सारंगखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय मोहने, ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. बाविस्कर, तलाठी नितेश मोरे, पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, सरपंच लिना चौधरी हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना घरातच थांबून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गावात आरोग्य पथक तैनात केले असून तपासणी केली जात आहे. खबरीदारी म्हणून बामखेडा गावात जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच व्यवहार पुढील पाच दिवस बंद राहणार आहेत. किराणा दुकान, मांस विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सलून व्यावसायिक, पानटपऱ्या आदी दुकाने शंभर टक्के बंद ठेवण्यात आले आहे. कुणीही विनाकारण पुढील पाच दिवस घरातून बाहेर निघू नये. नातेवाईकांनाही गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शेती कामे व शेतमजुरांची कामेही बंद ठेवावीत, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details