नंदुरबार-'आधी लगीन पाण्याचे, मग माझे' असे म्हणत शहादा तालुक्यातील विरपूर येथील महिला सरपंच अल्का निलसिंग पवार यांचा अनोखा उपक्रम संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेत आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेल्या आणि आदिवासी बहुल वस्ती असलेल्या या गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी महिला सरपंचाने पुढाकार घेतला आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत गावातीलच नागरीकांनी अल्का निलसिंग पवार या सुशिक्षीत तरुणीला उभे करुन निवडुन आणले. अल्का हिने इयत्ता अकरावी, बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे पुर्ण केले. नर्सिंगचे शिक्षण नगर जिल्ह्यातील कोरपेवाडी येथे पुर्ण केले. या शिक्षणाचा फायदा तिने गावकऱ्यांसाठी व गावाच्या विकासासाठी करण्याचे ठरविले आहे.
अल्का पवार निवडुन आल्यानंतर गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार तिने केला आहे. अल्का पवार निवडुन आल्यानंतर गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार तिने केला. गावाला पाणीपुरवठा करणाऱया दोनशे फूट खोल बोअरची दुष्काळात पाणी पातळी खालवल्याण्यानंतर पाईप वाढवुन ती पुन्हा सुरू करण्यात आली. गावात पाच हँड पंप असून त्यापैकी एक बंद झाला आहे. तर बाकीच्या हँडपंपांमधून कमी पाणी येते. हे लक्षात आल्यावर अल्काने गावाजवळ असलेल्या नाल्यात गावकऱ्यांच्या मदतीने विहिर खोदली व तिला पाणी देखील लागले. पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातगी गावाने सहभागी होण्याचे ठरविले.
गावात बैठक घेऊन गावकरी, शाळकरी मुले मुली यांच्या सहकार्याने दोनशे सहा हेक्टर डोंगराळ भागात सीसीटी प्रकाराचे खड्डे तयार करण्यास सुरुवात केली. 'पाणी अडवा पाणी जिरवा' या संकल्पनेतून पाण्यासाठी संघर्ष चालू केला. गावातील लहान लहान बालके, मुल-मुली व काही स्री-पुरुषांना सोबत घेवुन पंधरा ते वीस जणांचा समुदायाने हे काम सुरू ठेवले आहे. सीसीटी काम सुरू असताना किती तरी वेळा अल्का हिला लग्नासाठी पहाण्यासाठी मुलाकडची मंडळी आली आहे. तुला घरी बोलावले आहे, असा निरोप यायचा तेव्हा ती तेथुनच उत्तर द्यायची 'आधी माझं गाव पाणीदार करेन मग लग्न'.
गावाला सुशिक्षित सरपंच लाभला हे आमचे भाग्य आहे. तिचे चांगले विचार पाहुन आम्हालाही आनंद होतो. असे येथील गावकरी सांगतात. सरपंच अल्का निलसिंग पवार यांच्या पुढाकारतून गावात अनेक विकासकामे सुरू आहेत. गावातील दोनशे सहा हेक्टर परिसरात जनार्थ आदिवासी विकास संस्था व गावकऱ्यांचा सहकार्याने वीस हजार फळ झाडी लावली जात आहेत. पाणी साठवणुकीसाठी कृषी खात्यामार्फत दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे, दगडी बांध हे गावकऱ्यांच्या श्रमदानातुन करण्यात आले.