महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार नगरपालिका अंतर्गत अपघातातील मृतांच्या वारसांना धनादेश वाटप - चंद्रकांत रघुवंशी

नगरपालिके तर्फे शहरातील सर्व मतदारांचा जनता अपघात विमा योजना अंतर्गत विमा काढण्यात आला आहे. या योजनेत शहरातील मतदार अपघातात मृत झाल्यास त्यांच्या वारसांना मदत म्हणून एक लाख रुपये दिले जातात. दरम्यान, दि.२७-९-२०१८ रोजी नंदुरबार शहरातील सुभाष परशुराम ओतारी हे अपघातात मृत झाले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चौधरी यांनी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे मृतांच्या वारसांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा केला.

नंदुरबार नगरपालिका अंतर्गत अपघातात मृतांच्या वारसांना धनादेश वाटप

By

Published : Sep 11, 2019, 1:39 AM IST

नंदुरबार- शहरातील अपघातात मृत झालेल्या मृतांच्या वारसांना पालिकेच्या जनता अपघात विमा योजना अंतर्गत १ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते देण्यात आला.

हेही वाचा-नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचे जेलभरो आंदोलन

नगरपालिके तर्फे शहरातील सर्व मतदारांचा जनता अपघात विमा योजना अंतर्गत विमा काढण्यात आला आहे. या योजनेत शहरातील मतदार अपघातात मृत झाल्यास त्यांच्या वारसांना मदत म्हणून एक लाख रुपये दिले जातात. दरम्यान, दि.२७-९-२०१८ रोजी नंदुरबार शहरातील सुभाष परशुराम ओतारी हे अपघातात मृत झाले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चौधरी यांनी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे मृतांच्या वारसांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा केला. प्रस्तावासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याने मृतांचे वारस आई जयवंता परशुराम ओतारी व पत्नी रेखाबाई सुभाष ओतारी यांना आ.चंद्रकांत रघुवंशी व आ.सुधीर तांबे यांच्या हस्ते एक लाखाचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यासाठी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष परवेज खान, बांधकाम सभापती कुणाल वसावे, सभापती कैलास पाटील, सभापती जागृती संजय सोनार, सभापती मनिषा चेतन वळवी यांचे सहकार्य लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details